बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचं मानधन थकवलं ?

  • बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या २७ खेळाडूंना प्रत्येक तिमाहीत श्रेणीनुसार मानधन दिले जाते. मात्र मागील वर्षीतील ऑक्टोंबर महिन्यापासून या सर्व खेळाडूंना मानधन मिळालेच नसल्याची माहिती मिळाली आहे. बीसीसीआय भारतीय खेळाडूंना A+, A, B आणि C अशा ४ श्रेणींमध्ये विभागते. यामध्ये A+ दर्जाच्या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी मानधन मिळतं, तर उर्वरित श्रेणींमधील खेळाडूंना अनुक्रमे ५, ३ आणि १ कोटी रुपये वार्षिक मानधन मिळतं.

मुंबई:  आयपीएल सारख्या स्पर्धेतून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दरवर्षी हजारो कोटी रूपये कमवते. परंतु यंदाच्या वर्षात कोरोना विषाणूसारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा फटका क्रिकेट क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे क्रिकेटचे अनेक सामने रद्द करण्यात आले आहेत. परंतु गेल्या १० महिन्यांपासून भारतीय संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना बीसीसीआयने मानधन दिलं नसल्याची माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या २७ खेळाडूंना प्रत्येक तिमाहीत श्रेणीनुसार मानधन दिले जाते. मात्र मागील वर्षीतील ऑक्टोंबर महिन्यापासून या सर्व खेळाडूंना मानधन मिळालेच नसल्याची माहिती मिळाली आहे. बीसीसीआय भारतीय खेळाडूंना A+, A, B आणि C अशा ४ श्रेणींमध्ये विभागते. यामध्ये A+ दर्जाच्या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी मानधन मिळतं, तर उर्वरित श्रेणींमधील खेळाडूंना अनुक्रमे ५, ३ आणि १ कोटी रुपये वार्षिक मानधन मिळतं. 

बीसीसीआयने जाहीर केलेल्या आर्थिक रेकॉर्डनुसार, संस्थेकडे ५ हजार ५२६ कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. याव्यतिरीक्त २ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम बीसीसीआयने एफडी स्वरुपात ठेवली आहे. तरीही भारतीय संघातील करारबद्ध खेळाडूंना १० महिन्यांपासून आपलं मानधन मिळालेलं नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. परंतु कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे सर्व घडत असल्याचा अंदाज आहे.