सामना सुरू होण्यापूर्वी शमीने दिला दिपक चहरला आशीर्वाद, त्यानंतर चहरने चांगलाच दिला पंजाबला दणका

चेन्नईने हे विजयी आव्हान 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. (Moeen Ali) मोईन अली, फॅफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) आणि दीपक चहर (Deepak Chahar) ही तिकडी चेन्नईच्या विजयाचे हिरो ठरले.

    मुंबई : चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) केएल राहुलच्या (K L Rahul) पंजाब किंग्सला (Punjab Kings) पाणी पाजलं आहे. चेन्नईने पंजाबवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे विजयी आव्हान 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. (Moeen Ali) मोईन अली, फॅफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) आणि दीपक चहर (Deepak Chahar) ही तिकडी चेन्नईच्या विजयाचे हिरो ठरले.

    वेगवाग गोलंदाज चहरने पंजाबच्या 4 विकेट्स घेत पंजाबच्या सलामी जोडी आणि मीडल ऑर्डरच्या फलंदाजांना माघारी धाडलं. त्याच्या या कामगिरीनंतर चहर आणि पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शमी आणि दीपक एकत्र दिसत आहेत. दीपक या फोटोत मोहम्मद शमीच्या पाया पडताना दिसत आहे. हा फोटो सराव करतानाचा दिसून येत आहे.