Ben Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं ?

राजस्थाननं स्टोक्सला इंग्लंडला जाण्यापूर्वी त्याचे वडील गेरार्ड स्टोक्स यांच्या नावाची जर्सी दिली. गेरार्ड यांचं मागच्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. ही जर्सी पाहताच स्टोक्सला वडिलांची आठवण झाली, आणि तो त्या आठवणीनं हळवा झाला. स्टोक्सच्या हाताचं 19 एप्रिल रोजी ऑपरेशन होणार आहे. त्यानंतर त्याला 12 आठवडे क्रिकेटपासून दूर राहवं लागणार आहे.

    मुंबई: राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंडला रवाना झाला आहे. स्टोक्सला राजस्थानच्या पहिल्या मॅचमध्ये हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेतून आऊट झाला आहे. राजस्थान रॉयल्सनं स्टोक्सला रविवारी भावुक निरोप दिला.

    राजस्थाननं स्टोक्सला इंग्लंडला जाण्यापूर्वी त्याचे वडील गेरार्ड स्टोक्स यांच्या नावाची जर्सी दिली. गेरार्ड यांचं मागच्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. ही जर्सी पाहताच स्टोक्सला वडिलांची आठवण झाली, आणि तो त्या आठवणीनं हळवा झाला. स्टोक्सच्या हाताचं 19 एप्रिल रोजी ऑपरेशन होणार आहे. त्यानंतर त्याला 12 आठवडे क्रिकेटपासून दूर राहवं लागणार आहे.

    बेन स्टोक्स आता आयपीएलसह जूनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या दोन टेस्टची मालिका आणि श्रीलंका विरुद्ध 23 जून ते 4 जुलै या काळात होणारी मर्यादीत ओव्हर्सच्या मालिका (वन-डे आणि टी20) खेळू शकणार नाही. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजपूर्वी तो फिट होण्याची शक्यता आहे.