‘बेनूर’ ऑल इंग्लंड चैम्पियनशिप : सिंधू विजयाची प्रबळ दावेदार

सिंधूचा सामना मलेशियाच्या सोनिया चियासोबत होणार असून उपान्त्य सामन्यात तिची लढत जपानची अकोन यामागुची सोबत होण्याची शक्यता आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता सायनाचा सामना पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टसोबत होईल.

    बर्मिंघम : जागतिक चॅम्पियन पी.व्ही. सिंधू स्वीस ओपन अंतिम सामन्यात झालेला पराभव विसरून आज बुधवारपासून सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत खिताब पटकावण्याच्या उद्देशाने उतरणार आहे. स्वीस ओपन फायनलमध्ये स्पेनच्या कॅरालिना मारिनने एकतर्फी लढतीत सिंधूचा पराभव केला होता. तीनवेळा चॅप्मियनशिप पटकावणाऱ्या मारिनने यंदा मात्र जखमी असल्यामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. यासोबतच चीन, कोरिया आणि चीनी तायपैचे खेळाडूही या सुपर १००० टूर्नामेंटमध्ये भाग घेणार नाहीत. दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे भारताच्या १९ सदस्यीय पथकाला कामगिरी बजावण्याची ही उत्कृष्ट संधी आहे. या स्पर्धेत भारतातर्फे प्रकाश पादुकोण (१९८०) आणि पुलेला गोपीचंद (२००१) यांच्या व्यतिरिक्त कोणालाही येथे विजय मिळू शकला नव्हता. २०१५ मध्ये सायना नेहवालने उपविजेतेपद पटकावले होते. २०१८ मध्ये उपान्त्य सामन्यात सिंधूने धडक मारली होती परंतु त्यानंतर कोणीही त्यापुढे जाऊ शकल नाही. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधू पुन्हा एकदा विजयाची प्रबळ दावेदार आहे परंतु सायना मात्र अद्यापही फॉर्ममध्ये परतलेली नाही. गेल्या दोन वर्षात केवळ दोनवेळाच ती उपान्त्य सामन्यात धडक मारू शकली आहे. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये जागतिक दर्जाचा क्रमांक एकचा खेळाडू किदाम्बी श्रीकांत आणि दुहेरीत सात्विक साइराज रांकिरेड्डी तसेच चिराग शेट्टीने स्वीस ओपनमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले होते ते आपली लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील.

    रोमांचक लढती होण्याची शक्यता
    सिंधूचा सामना मलेशियाच्या सोनिया चियासोबत होणार असून उपान्त्य सामन्यात तिची लढत जपानची अकोन यामागुची सोबत होण्याची शक्यता आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता सायनाचा सामना पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टसोबत होईल. पुरुष एकलमध्ये श्रीकांतची लढत इंडोनेशियाच्या टॉमी सुगीआर्तोसोबत होणार असून बी. साई फ्रांसच्या तोमा ज्युनिअर पोपोव्हचा सामना करणार आहे. राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यपचा सामना पहिल्या फेरीत जपानच्या के केंतो मोमोताविरुद्ध होई. मोमोता सध्या विश्व रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. यासोबतच एच.एस. प्रणयची लढत मलेशियाच्या डारेन लियूसोबत होईल. तर समीर वर्माचा सामना ब्राझीलच्या यगोर कोल्होसोबत होणार आहे. महिला युगलमध्ये अश्विनी आणि एन. सिक्की रेड्डीचा सामना थायलंडच्या बेनियापा एमसार्ड आणि नुंताकार्न एमसार्डसोबत होणार आहे.