आयपीएलच्या मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली मॅचवर सट्टा; तिघांना अटक

उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट थारासिंग दरबार परिसरातील महाबजाज व्हिला बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट मॅचमधील मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली कॅपिटल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती.

    उल्हासनगर कॅम्प नं-३ थारासिंग दरबार परिसरातील महाबजाज व्हिला बंगल्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री साडे सात वाजता धाड टाकली. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटलच्या आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह लॅपटॉप, मोबाईल असा एकून १३ लाख ८१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

    उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट थारासिंग दरबार परिसरातील महाबजाज व्हिला बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट मॅचमधील मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली कॅपिटल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी साडे सात वाजता धाड टाकून धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज व चिरंजीव आहुजा अशा तिघाना पोलिसांनी अटक केली.