भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतची खेलरत्नसाठी शिफारस

नवी दिल्ली : खेलरत्न क्रिडा पुरस्कारासाठी भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून शिफारस करण्यात आली आहे. परंतु अर्जुन पुरस्कारासाठी

 नवी दिल्ली : खेलरत्न क्रिडा पुरस्कारासाठी भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून शिफारस करण्यात आली आहे. परंतु अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न झाल्याने, प्रणॉयने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या मागील कारणं काय आहे. त्याची कारणे दाखवा असं संघटनेकडून प्रणॉयला नोटीस पाठवण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये मनिला येथे झालेल्या आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीकांत आणि प्रणॉय हे दोघेही न खेळता, ते बार्सिलोना येथील अन्य स्पर्धा खेळण्यासाठी निघून गेले होते. त्यामुळे श्रीकांतने या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. श्रीकांतने त्याची चूक मान्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र बीएआयचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले की, प्रणॉय सातत्याने शिस्तभंग करत आहे. आतापर्यंत प्रणॉयच्या वागण्याकडे संघटनेकडून दुर्लक्ष करण्यात आले, मात्र या वेळेस त्याला कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.