टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने पटकावले silver medal ; पंतप्रधानांनी केले ‘हे’ ट्विट

भाविना पटेलने टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत हे पदक मिळवले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविनाने तिच्या पाहिल्याचा पॅरालिम्पिक गेम्समध्ये देशाला पदक मिळवून दिले आहे.

    टोकियो: आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारताला पहिले पदक मिळाले आहे. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने (Bhavina patel) हिने चमकदार कामगिरी करत भारताला रौप्य(silver medal)  पदकाची कमाई करुवून दिली आहे.

    भाविना पटेलने टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत हे पदक मिळवले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविनाने तिच्या पाहिल्याचा पॅरालिम्पिक गेम्समध्ये देशाला पदक मिळवून दिले आहे. तिला जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या चीनच्या पॅडलरकडूनपराभव स्वीकारावा लागला. भाविनाच अंतिम सामान्यत ३-० ने पराभव झाला.

    टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलने रौप्य पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना पटेल सोबत बातचीत करत तिचे अभिनंदन केले आहे. मोदींनी तिच्या प्रयत्नांचे कौतुक करत भविष्यतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी भारताला पदक मिळाल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. अर्थात, या दिवशी खेळाडूंचा सन्मान होतो. त्याच दिवशी ३४ वर्षीय भारतीय पॅडलरने आपल्या खेळात देशाचं नाव रोशन केले आहे. पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भाविनावर नवखेपणा कोणताही दबाव नव्हता. तिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आत्मविश्वास होता, ज्यावर ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली.