टीम इंडियाला मोठा झटका, पंत बाद झाला नसता, तर…

भारताच्या सर्व खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद होती, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी ११८ चेंडूत ९७ धावांची खेळी करणाऱ्या पंतचे विशेष कौतुक केले. भारताची कामगिरी फारच उत्कृष्ट होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी कसोटी सामन्यात खेळण्यात आला. यामध्ये टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकण्यासाठी भारतासमोर ४०७ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसअखेर दोन विकेट गमावल्या होत्या. तर पाचव्या दिवशी दुसऱ्याच षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला. मात्र, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, हनुमा विहारी आणि अश्विनच्या झुंजार खेळींमुळे भारताने हा सामना अनिर्णित राखला.

भारताच्या सर्व खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद होती, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी ११८ चेंडूत ९७ धावांची खेळी करणाऱ्या पंतचे विशेष कौतुक केले. भारताची कामगिरी फारच उत्कृष्ट होती. चौथ्या दिवशी दोन विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ हा सामना वाचवू शकेल असे कोणालाही वाटले नव्हते. मी भारताच्या या यशाचे श्रेय रिषभ पंतला देईन. त्याने अप्रतिम खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारताला सामना जिंकण्याची संधी निर्माण झाली होती.