टीम इंडियाला मोठा झटका, विराट कोहली ५० धावांवर बाद

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले असून तो बाद झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. आजपासून सुरु होणारा चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की आहे.

  टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा पहिला निर्णय घेतला आहे. परंतु टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले असून तो बाद झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. आजपासून सुरु होणारा चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की आहे.

  टीम इंडियाला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

  टीम इंडियाचा रेकॉर्ड ओव्हलमध्ये चांगला राहिलेला नाहीये. १३ पैकी फक्त १कसोटी जिंकता आली आहे. ५० वर्षांपूर्वी टीम इंडियाला या मैदानावर शेवटचा विजय मिळाला होता. त्यामुळे भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे. या सामन्यात सर्वाधिक दबाव कर्णधार विराट कोहलीवर असणार आहे. तसेच चौैथा कसोेटी सामना टीम इंडियासाठी जिंकणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

  असे असतील दोन्ही संघ

  टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  इंग्लंड : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, हसीब हमीद,जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, ओली पोप, मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.