‘बायोबबल’चा फुगा फुटला ! आता फक्त एक मॅच रद्द झालेय; येवू शकते IPL रद्द करण्याची वेळ ?

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरु असताना आता इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कोलकातापाठोपाठ चेन्नईचे 3 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सोमवारचा सामना रद्द करण्यात आला. कोरोनाचा धोका लक्षात घेता. सर्व खेळाडूंना बायोबबलमध्ये ठेवण्यात आलेय. मात्र, 'बायोबबल'चा फुगा फुटला आहे. आता फक्त एक मॅच रद्द झालेय पण असेच प्लेअर्स पॉझिटिव्ह येत राहिले तर IPL रद्द करण्याची वेळ ? येवू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे.

  दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरु असताना आता इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कोलकातापाठोपाठ चेन्नईचे 3 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सोमवारचा सामना रद्द करण्यात आला. कोरोनाचा धोका लक्षात घेता. सर्व खेळाडूंना बायोबबलमध्ये ठेवण्यात आलेय. मात्र, ‘बायोबबल’चा फुगा फुटला आहे. आता फक्त एक मॅच रद्द झालेय पण असेच प्लेअर्स पॉझिटिव्ह येत राहिले तर IPL रद्द करण्याची वेळ ? येवू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे.

  कोलकत्ताप्रमाणे चैन्नईच्या प्लेअर्सनाही कोरोनाची लागण झाली आहे. चैन्नईचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे किंग्ज इलेव्हन पंजाबचा एक प्लेअरही कोरोनाबाधित झाल्याची माहिती आहे. आयपीएलची सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत सात प्लेअर्सना कोरोनाची लागण झाली आहे. यात नितीश राणा (KKR), अक्षर पटेल (DC), डॅनियल सॅम्स (RCB), एनरिक नॉर्खिया (DC) आणि देवदत्त पडिक्कल (RCB) यांचा समावेश आहे. हे सर्व जण लिग सुरु होण्यापूर्वी पॉझिटिव झाले होते, आणि त्यावेळी आयसोलेशनमध्ये होते. आयपीएलमध्येही आत्तापर्यंत सात प्लेअर्स पॉझिटिव्ह आले आहेत. ग्राऊंडवरील अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झालेय.

  बायोबबल म्हणजे काय?

  कोरोना काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून सर्व खेळाडूंना आता ‘बायो बबल’मध्ये राहावे लागते. यात खेळाडूंना त्यांच्या हॉटेलमध्ये राहावे लागते. त्यांच्या प्रवासावर आणि हालचालींवर निर्बंध येतात. त्यांना कुणाला भेटताही येत नाही. स्टेडियम आणि हॉटेल असा इतकाच प्रवास करण्याची मुभा खेळाडूंना असते.

  कोरोनामुळे रद्द झाली होती पाकिस्तानी सुपर लिग (PSL)

  कोरोनामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला पाकिस्तानी सुपर लिग (PSL) रद्द करावी लागली होती. फेब्रुवारीत पाकिस्तानमध्ये पीएसएल सुरु झाली होती. यावेळी सहा प्लेअर्ससह ८ जण कोरोना संक्रमित झाले. त्यानंतर १४ मॅचेसनंतर पीएसएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही लिग जूनमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.