टोक्यो ऑलम्पिकमध्ये भारतीय महिला खेळाडूंचं उत्कृष्ट प्रदर्शन ; बॉक्सर पुजा रानी उपांत्य पूर्व फेरीत दाखल, तर दीपिका कुमारीही विजयी

तिरंदाजीमध्ये दीपिका कुमारीने पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. बॉक्सिंगमध्ये पूजा रानीने उत्कृष्ठ खेळ दाखवत पहिला राउंड स्वत:च्या नावे करत सामन्यात आघाडी घेतली आहे.

    टोक्यो ऑलम्पिकमध्ये भारतीय महिला खेळाडूंचं उत्कृष्ट प्रदर्शन पहायला मिळत आहे. तिरंदाजीमध्ये दीपिका कुमारीने पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. बॉक्सिंगमध्ये पूजा रानीने उत्कृष्ठ खेळ दाखवत पहिला राउंड स्वत:च्या नावे करत सामन्यात आघाडी घेतली आहे.

    पूजा रानीने ऑलिम्पिकमधील सलामीचा सामना ५-० ने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश मिळवला आहे. पूजा पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. तसेच बॅडमिंटनपटू पीव्ही सिंंधू आणि तिरंदाजीमध्ये दीपिका कुमारीने तिरंदाजी स्पर्धेमध्ये सलग दुसरा उत्कृष्ट विजय मिळवत पुढची फेरी गाठली आहे. तिने अंतिम ८  मध्ये जागा मिळवली आहे. परंतु हॉकी टीमला सलग तिसऱ्या वेळेस अपयशाला समोरे जावं लागलं आहे.