ब्रिटनची १८ वर्षीय एम्मा रडुकानूने जिंकले ‘ ग्रँडस्लॅम’

या विजयामुळे ब्रिटनची महिला एकेरीच्या स्पर्धेत ग्रँडस्लॅमसाठीची तब्बल ४४ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. यापूर्वी 19७७ मध्ये, ब्रिटिश खेळाडू व्हर्जिनिया वेडने यूएस ओपनच्या महिला एकेरीत ग्रँड स्लॅम जिंकले होते.

    न्यूयार्क: ब्रिटीश टेनिस खेळाडू एम्मा रडुकानूने(१८)(EmmaRaducanu)ने यूएस ओपन टेनिसच्या(US Open Tennis)  महिला एकेरीच्या स्पर्धेत ग्रँडस्लॅम (Grand Slam )विजेतेपद पटकावले आहे. तिने कॅनेडियन टेनिसपटू लेला फर्नांडिसचा (leylahfernandez)(१९) अंतिम सामान्यत ६-४ आणि ६-३ असा थरारक पराभव करत यूएस ओपनच्या महिला एकेरीच्या स्पर्धेत ग्रँडस्लॅमवर आपले नाव कोरले.

    या विजयामुळे ब्रिटनची महिला एकेरीच्या स्पर्धेत ग्रँडस्लॅमसाठीची तब्बल ४४ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. यापूर्वी 19७७ मध्ये, ब्रिटिश खेळाडू व्हर्जिनिया वेडने यूएस ओपनच्या महिला एकेरीत ग्रँड स्लॅम जिंकले होते.

    एम्माच्या यशानंतर ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांनी एम्माचे अभिनंदन केलं असून, हे यश तिच्या कठोर परिश्रम आणि खेळा प्रति असलेल्या समर्पणाचे असल्याचे म्हटले आहे. ग्रँडस्लॅम विजेत्या एम्मावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. यूकेचे पंतप्रधान यांनीही एम्माचे अभिनंदन केले आहे.

    “माझ्यासाठी ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे, माझे पालक आणि सर्व ब्रिटनवासीयांनी दिलेल्या पाठींबा व प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचे आभार मानते” , अशी भावना एम्माने व्यक्त केली आहे