ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल, शेवटच्या कसोटीतील महत्त्वाचा निर्णय

सिडनी टेस्टमधील ऑस्ट्रेलियाचा ओपनर विल पुकोवस्की (Will Pucovski) ब्रिस्बेन टेस्ट खेळणार नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) दिली आहे. पुकोवस्कीच्या जागेवर मार्कस हॅरिसचा (Marcus Harris) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन कसोटी सामन्याला १५ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. परंतु या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. सिडनी टेस्टमधील ऑस्ट्रेलियाचा ओपनर विल पुकोवस्की (Will Pucovski) ब्रिस्बेन टेस्ट खेळणार नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) दिली आहे. पुकोवस्कीच्या जागेवर मार्कस हॅरिसचा (Marcus Harris) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

बॉर्डर – गावसकर ट्रॉफीमधील तिसरी टेस्ट सिडनीमध्ये झाली. टीम इंडियानं (Team India) जोरदार प्रदर्शन करत ती टेस्ट ड्रॉ केली. या टेस्टमध्ये फिल्डिंग करताना पुकोवस्कीचा खांदा दुखावला होता. त्यामुळे त्याला अन्य खेळाडूंच्या मदतीनं बाहेर नेण्यात आलं होतं.

भारताविरुद्धच्या सराव सामन्यात कार्तिक त्यागीने टाकलेला बॉल पुकोवस्कीच्या डोक्याला लागल्यानं तो जखमी झाला होता. मार्कस हॅरिस हा या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा पाचवा ओपनर असेल. यापूर्वी जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड यांनी पहिल्या दोन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची सुरुवात केली होती.