चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय

सलामीच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Mumbai Indians Vs  Chennai Super Kings) या दोन संघात क्रिकेटचा सामना सुरू होता. मात्र, सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून दणदणीत विजय (Win)  मिळवला आहे.

आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) हंगामाला काल शनिवारपासून सुरूवात झाली आहे. तसेच सलामीच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Mumbai Indians Vs  Chennai Super Kings) या दोन संघात क्रिकेटचा सामना सुरू होता. मात्र, सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून दणदणीत विजय (Win)  मिळवला आहे. २०१८ पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली.

मुंबई इंडियन्सचा वेगवान फलंदाज सौरभ तिवारीच्या उत्कृष्ट खेळीमुळे मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एन्ट्री घेतली असता तो १२ धावा काढून झेलबाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉकही ३३ धावांवर माघारी परतला.

अंबाती रायुडू (७१) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५८) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. या विजयासह आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने एक विक्रम केला. एखाद्या संघाचे नेतृत्व करताना १०० विजय मिळवणारा धोनी IPL इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे.