चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात आज होणार लढत, कोणता संघ मारणार बाजी ?

पहिल्या सामन्यात मुंबईला (MI) पराभूत केल्यानंतर दुसर्यां सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (RR) पराभवाचा सामना करावा लागलेल्या चेन्नई संघाला (CSK) आज पुन्हा एकदा विजयांची आशा आहे. तर दुसरीकडे दिल्लीसाठी (DC) हा दुसरा सामना असणार आहे. दुबईत हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.

दुबई : आयपीएल २०२० च्या (IPL 2020)  १३ व्या हंगामातील सातवा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल (Chennai Super Kings VS  Delhi Capital ) यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला (MI) पराभूत केल्यानंतर दुसर्यां सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (RR) पराभवाचा सामना करावा लागलेल्या चेन्नई संघाला (CSK) आज पुन्हा एकदा विजयांची आशा आहे. तर दुसरीकडे दिल्लीसाठी (DC) हा दुसरा सामना असणार आहे. दुबईत हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.

दिल्ली संघात पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत, कॅप्टन श्रेयस अय्यर आणि शेवटच्या सामन्याचा नायक मार्कस स्टोइनिस सारखे मोठे हिटर आहेत. तर चेन्नई संघाकडून शेन वॉटसन आणि मुरली विजय सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरु शकतात. मधल्या फळीतील फलंदाजीची जबाबदारी फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू, ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार एमएस धोनी यांच्या खांद्यावर असेल. तर रविंद्र जडेजा, पियूष चावला, सॅम करन, लुंगी एन्गिडी आणि दिपक चाहर हे गोलंदाजही चेन्नईच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असतील.

पहिल्या सामन्यात दिल्लीने पंजाबविरुद्ध विजय मिळविला असता तर संघाचा आत्मविश्वास वाढला असता. दिल्लीकडे युवा खेळाडूंचा उत्साह असेल तर दुसरीकडे चेन्नईकडे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे या सामन्यात नक्की कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.