क्या बात है! एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धवर (Kolkata Knight Riders) २ विकेट्सनं मात केली आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

    IPL 2021 चा थरारक सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यामध्ये पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धवर (Kolkata Knight Riders) २ विकेट्सनं मात केली आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.


    चेन्नईला विजयासाठी १५ चेंडूत ३० धावांची गरज असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी बाद झाला आणि सामन्यावर पूर्णपणे केकेआरनं पकड निर्माण केली होती. अखेरच्या षटकात चेन्नईला विजायासाठी ४ धावांची गरज होती. सुनील नरेनच्या पहिल्याच चेंडूवर सॅम कुरन झेल बाद झाला. अखेरच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी एक धाव आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी कोलकाताला डॉट चेंडूची गरज होती. पण दिपक चाहरनं मिड विकेटच्या दिशेनं फटका लगावत एक धाव पूर्ण केली आणि चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.