चिनी जाहीरातदारांबाबत इंडियन ऑलम्पिक असोसिएशनचा मोठा निर्णय

नवी दिल्ली :भारत आणि चीन यांच्यात सीमावाद प्रश्न सुरू आहे. तसेच या दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. त्यामुळे चिनी जाहीरातदारांबाबत इंडियन ऑलम्पिक अशोसिएशनने मोठा

 नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात सीमावाद प्रश्न सुरू आहे. तसेच या दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. त्यामुळे चिनी जाहीरातदारांबाबत इंडियन ऑलम्पिक अशोसिएशनने मोठा निर्णय़ घेतला आहे. देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यास सुरूवात केली आहे. तसेच भारतीय एथलिट्सनी सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या स्थितीमध्ये आयओए देशाच्या बाजूने उभी राहीली आहे. त्यामुळे चिनी जाहीरातदारांशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवण्याचा निर्णय इंडियन ऑलम्पिक असोसिएशनने घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑलम्पिकमध्ये ‘ली निंग’ सारख्या चीनी प्रायोजकांवर बहिष्कार घालण्यात येत असल्याची माहिती आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी दिली. चीनी जाहीरातदारांशी संबंध तोडण्याच्या निर्णयाला आयओए कोषाध्यक्ष आनंदेश्वर पांडे यांनी देखील पाठींबा दिला आहे. दरम्यान, मे २०१८ मध्ये ली निंगसोबतच्या करारावर आयओएने स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार भारतीय एथलीट्सना चिनी कंपनी कीटची पूर्तता करते. मात्र भारत-चीनमध्ये सीमारेषेवरील वाढता तणाव पाहता चीनी कंपन्यांशी संबंध न ठेवण्याचे ठरवलं आहे.