क्रिस गेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड : टी-२० मालिकेत गेलच्या १४ हजार धावा पूर्ण, झम्पाच्या बॉलवर गेलने उडवला धुव्वा

टी-२० सामन्यात गेलने १४ हजारपेक्षा जास्त धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच एकूण २२ शतके पूर्ण केले आहेत. त्याचप्रमाणे त्याचे षटकार पाहिले असता १ हजार २८ षट्कार पूर्ण झाले आहेत. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात आयलेटमध्ये खेळण्यात येणाऱ्या तीसऱ्या टी-२० मालिकेत गेलने उत्तम कामगिरी केली आहे.

  वेस्ट इंडीजचा युनिव्हर्स बॉस क्रिस गेलने अनोखा विक्रम केला आहे. गेलने क्रिकेटमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टी-२० सामन्यात गेलने १४ हजारपेक्षा जास्त धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच एकूण २२ शतके पूर्ण केले आहेत. त्याचप्रमाणे त्याचे षटकार पाहिले असता १ हजार २८ षट्कार पूर्ण झाले आहेत. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात आयलेटमध्ये खेळण्यात येणाऱ्या तीसऱ्या टी-२० मालिकेत गेलने उत्तम कामगिरी केली आहे.

  सर्वात जास्त धावा टी-२० मालिकेत गेलनंतर टॉप-५ च्या लिस्टमध्ये एकमेव भारतीय खेळाडू विराट कोहलीचा लागतो. कोहलीने आतापर्यंत ३१० टी-२० सामन्यांत ९ हजार ९२२ धावा पूर्ण झाल्या असून पाचवे स्थान पटकावले आहे.

  वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियामधील मालिका

  वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ग्रॉस आयलेटमध्ये ५ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. मंगळवारी ऑस्ट्रेलिया संघाला विंडीजने तिसऱ्या मालिकेत ६ विकेट्सने हरवलं आहे.  सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने ६ गडी बाद करत १४१ धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर विंडीजने १४२ धावा पूर्ण करत आणि ४ गडी गमावत सामना आपल्या ताब्यात मिळवला आहे.

  अँडम झम्पाच्या बॉलवर गेलने उडवला धुव्वा   

  या सामन्यात क्रिस गेलने ३८ चेंडूत ६७ धावा पूर्ण करत एक मोठं रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे. त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून सुद्धा निवडण्यात आलं आहे. गेलने अँडम झम्पाच्या बॉलवर अनेक षट्कार लगावले आहेत. तसेच षटकार मारत टी-२० मध्ये १४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

  टी-२० मधील पाच टॉप खेळाडू

  क्रिस गेल – ४३१ सामने आणि १४ हजार ३८ धावा पूर्ण

  कायरन पोलार्ड – ५४५ सामने आणि १० हजार ८३६ धावा पूर्ण

  शोएब मलिक – ४२५ सामने आणि १० हजार ७४१ धावा पूर्ण

  डेविड वॉर्नर – ३०४ सामने आणि १० हजार १७ धावा पूर्ण

  विराट कोहली – ३१० सामने आणि ९ हजार ९२२ धावा पूर्ण

  तुम्हाला या टी-२० च्या टॉप-५ खेळाडूंबद्दल आणि यूनिव्हर्स बॉस क्रिस गेलबाबत काय वाटतं ? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…