चॅम्पियन्सची टक्कर, रोहितने टॉस जिंकला ; सीएसकेला पहिल्याच षटकात पहिला धक्का

मुंबईच्या ट्रेंट बोल्टने चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पहिल्याच षटकात ४ धावांवर बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर फाफ ड्युप्लेसिस आणि मोईन अलीने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये सीएसकेला ४९ धावांपर्यंत पोहचवले.

  नवी दिल्ली : आयपीएलमध्ये (IPL 2021) आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या दोन चॅम्पियन टीममध्ये मुकाबला होत आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम (James Neesham) मुंबईसाठी पदार्पण करत आहे.

  मुंबईच्या ट्रेंट बोल्टने चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पहिल्याच षटकात ४ धावांवर बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर फाफ ड्युप्लेसिस आणि मोईन अलीने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये सीएसकेला ४९ धावांपर्यंत पोहचवले.

  मुंबईची टीम

  रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जेम्स नीशम, राहुल चहर, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट

  चेन्नईची टीम

  ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, सॅम करन, शार्दूल ठाकूर, लुंगी एनगिडी, दीपक चहर