क्रिकेटवर पुन्हा फिक्सिंगचे ढग; ICC कडून 2 आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर 8 वर्षांची बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने संयुक्त अरब अमिरातचे खेळाडू आमिर हयात आणि अशफाक अहमद यांना भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन प्रकरणात दोषी आढळल्यानंतर आठ वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. आमिर हयात व अशफाक अहमद याचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. ते यूएईकडून खेळत होते. त्यांच्यावर 13 सष्टेंबर 2020 रोजी मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यादिवसांपासून त्याची शिक्षा लागू करण्यात आली आहे. या दोघांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने फिक्स करण्यासाठी भारतीय सट्टेबाजांकडून जवळपास 4083 डॉलरची रक्कम घेतली होती.

    दुबई : ‘जेन्टलमेन्स गेम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेट या खेळात खेळाडू जगभरात आपले नाव कमावतात तर काहीजण नाव गमातात. असे तेव्हाच ऐकायला येथे जेव्हा एखाद्या खेळाडूचे नाव स्पॉट फिक्सिंगमध्ये येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मॅच फिक्सिंग प्रकरणात यूएईच्या दोन खेळाडूंचे आठ वर्षांसाठी निलंबन केले आहे.

    निलंबन करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे आमिर हयात आणि अशफाक अहमद अशी आहेत. त्यांच्यावर भारतीय सट्टेबाजांसोबत मिळून टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामने फिक्स केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी ते दोघेही दोषी ठरले, त्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली आहे.

    दोन्ही खेळाडूंचे पाकिस्तान कनेक्शन

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने संयुक्त अरब अमिरातचे खेळाडू आमिर हयात आणि अशफाक अहमद यांना भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन प्रकरणात दोषी आढळल्यानंतर आठ वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. आमिर हयात व अशफाक अहमद याचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. ते यूएईकडून खेळत होते. त्यांच्यावर 13 सष्टेंबर 2020 रोजी मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यादिवसांपासून त्याची शिक्षा लागू करण्यात आली आहे. या दोघांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने फिक्स करण्यासाठी भारतीय सट्टेबाजांकडून जवळपास 4083 डॉलरची रक्कम घेतली होती.

    फिक्सिंगमध्ये आले नाव

    आमिर हयात हा वेगवान गोलंदाज आहे तर अशफाक अहमद हा फलंदाज आहे. हयातने 13 सामने खेळली असून यात त्याने 17 गडी बाद केली आहेत. तर अशफाकच्या नावे 28 सामने आहेत. कोर्टाने त्यांना लाचेमध्ये सामील झाल्याप्रकरणी आणि आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधातील अनेक प्रकरणांमध्ये त्यांना दोषी ठरवले. त्यांच्यावर कलम 2.1.3, 2.4.2, 2.4.3,2.4.4 आणि 2.4.5 अंतर्गत दोषी ठरवले आहे. दरम्यान, क्रिकेटमधील फिक्सिंग रोखण्यासाठी आयसीसी कठोर पाऊले उचलत आहे.