टीम इंडियाच्या कामगिरीवर कोच नाराज, मिडल ऑर्डरमध्ये मोठ्या बदलाचा दिला इशारा

भारतीय महिला क्रिकेट टीमचा (Indian Women Cricket Team) इंग्लंड विरुद्ध लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधील दोन्ही मालिकांमध्ये पराभव झाला आहे. या पराभवानंतर कोच रमेश पोवारने (Ramesh Powar) प्रतिक्रिया दिली आहे.

    लंडन : इंग्लंड विरुद्धच्या वन-डे मालिकेत कॅप्टन मिताली राजचा (Mithali Raja) अपवाद वगळता अन्य बॅटरला संघर्ष करावा लागला. मितालीचा स्ट्राईक रेट देखील फार प्रभावी नव्हता. त्यामुळे पोवार यांनी या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी काही नव्या खेळाडूंचा समावेश मिडल ऑर्डरमध्ये करण्याची गरज व्यक्त केली आहे.

    भारतीय महिला क्रिकेट टीमचा (Indian Women Cricket Team) इंग्लंड विरुद्ध लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधील दोन्ही मालिकांमध्ये पराभव झाला आहे. या पराभवानंतर कोच रमेश पोवारने (Ramesh Powar) प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवानंतर पोवर यांनी टीमच्या विचारात बदल करण्याची गरज असल्याचं सांगितलं असून काही बदल करण्याचे संकेत दिले आहे.

    ‘मितालीनं चांगली बॅटींग केली आहे. पण तिला आणखी किमान एकीनं चांगली साथ देण्याची गरज आगे. पॉवर प्ले नंतरच्या ओव्हर्समध्ये विरोधी टीमवर दबाव आणणे आवश्यक आहे.