जपानमध्ये कोरोनाचा कहर, सरकारने केली आणीबाणीची घोषणा

 सध्या टोकयोमध्ये ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) स्पर्धा सुरू आहे. जगभरातले हजारो खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी टोकयोमध्ये आहेत. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत आणीबाणी लागू करण्याबाबतची घोषणा केली आहे. टोकयो आणि ओकिनावामध्ये पहिल्यापासूनच आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

    कोरोना व्हायरसच्या (Corona Virus Japan) वाढत्या रुग्णांमुळे जपान सरकारने 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणी (Emergency) लागू केली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे. आणीबाणी टोकयो, सैतामा, चिबा, कानागावा, ओसाका आणि ओकिनावामध्ये लागू करण्यात आली आहे.

    सध्या टोकयोमध्ये ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) स्पर्धा सुरू आहे. जगभरातले हजारो खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी टोकयोमध्ये आहेत. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत आणीबाणी लागू करण्याबाबतची घोषणा केली आहे. टोकयो आणि ओकिनावामध्ये पहिल्यापासूनच आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

    ही आणीबाणी 22 ऑगस्टला संपणार आहे. देशात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आणीबाणीचा निर्णय घेण्यात आला आहे. महामारी सुरू झाल्यानंतर हे दोन्ही आकडे सर्वाधिक आहेत. सरकार कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न करत आहे