आयपीएलच्या अर्थचक्राला कोरोनाचा फटका, बीसीसीआयला २ हजार कोटींचे मोठे नुकसान

जर आयपीएल IPL रद्द करण्याचा निर्णय़ घेण्यात ला तर बीसीसीआयला २ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्याचबरोबर यावर्षी टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपदी भारताकडे आहे, त्या वर्ल्ड कपवरही कोरोनाचे संकट घोंगावते आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, भारताकडून यजमानपद जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बीसीसीआयला कोट्यवधींचा फटका बसेल.

  मुंबई : केकेआरचे दोन प्लेअर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, सोमवारची आयपीएलची मॅच रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, यानंतर IPL लीग रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. मात्र सध्या आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी आयपीएलच्या मॅचेस हा चांगला विरंगुळा असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे BCCI म्हणणे आहे. पुढचे २४ तास महत्त्वाचे असून, या काळात आयपीएलचे भवितव्य ठरणार आहे.

  जर आयपीएल IPL रद्द करण्याचा निर्णय़ घेण्यात ला तर बीसीसीआयला २ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्याचबरोबर यावर्षी टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपदी भारताकडे आहे, त्या वर्ल्ड कपवरही कोरोनाचे संकट घोंगावते आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, भारताकडून यजमानपद जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बीसीसीआयला कोट्यवधींचा फटका बसेल.

  गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचा IPLचा हंगामही दुबईत व्हावा, शी IPLच्या गव्हर्निंग कौन्सिलची इच्छा होती. असे झाले असते तर IPLचा हंगाम याही वर्षी सुपरहिट ठरला असता. पण भारतातील कोरोनाची स्थिती माहित असूनही टूर्नामेंट भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता संपूर्ण IPL हंगामच अनिश्चितेत सापडला आहे. भारतात IPL हंगाम यशस्वी करुन, देश टी-20साठी तयार असल्याचा संदेश बीसीसीआयला द्यायचा होता, असे काहींचें म्हणणे आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे.

  IPL रद्द होऊ शकते का ?

  IPL मुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सरकारलाही वेळेवर कर मिळत आहे. २००७-०८ मध्ये बीसीसीआयने ३५०० कोटी रुपये कराच्या रुपात भरले होते. आयपीएलपूर्वी बीसीसीआयला धर्मदाय संस्था मानण्यात येत होते. दरवर्षी आयपीएल हंगामातून BCCI ४० टक्के उत्पन्न मिळवीत असते.

  टेलीग्राफच्या एका वृत्तानुसार जागतिक क्रिकेटची अर्थव्यवस्था ही साधारणपणे १५ हजार कोटी रुपयांची आहे. यातील ३३ टक्के म्हणजेच ५ हजार कोटी रुपये आयपीएलमधून येतात. यामुळेच IPL लीगच्या आयोजनात जगभरातील क्रिकेट बोर्डांचे सहकार्य बीसीसीआयला मिळत असते. कोरोनामुळे द. अफ्रिका दौरा भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने रद्द केला, मात्र तरीही IPL खेळवली जात आहे. IPLनंतर भारताचा इंग्लंडचा दौरा आहे. हा दौरा इंग्लंड क्रिकेट बोर्डासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातोय. लॉकडाऊनमुळे इंग्लंड बोर्डाचे मोठे नुकसान झाले, ते या दौऱ्यात भरुन काढण्याचा प्रयत्न आहे.

  IPL रद्द न केल्यास ३ हजार कोटींचा नफा

  २०१९ मध्ये IPL ची एकूण उलाढाल ही ४७ हजार कोटींची होती. गेल्या वर्षी बीसीसीआयला ४ हजार कोटींचा नफा मिळाल्याची माहिती आहे. यावर्षी ही लीग यशस्वीपणे पार पडल्यास ३ हजार कोटींचा नफा बीसीसीआयला मिळण्याची शक्यता आहे.

  IPL रद्द झाल्यास २००० कोटींचा तोटा

  यंदाच्या IPL सिझनमध्ये गव्हर्निंग कौन्सिलने नवे अतिरिक्त मूल्य जोडलेले नाही, त्यामुळे मध्येच IPL रद्द् केल्यास क्रिकेट बोर्डाला २००० कोटींचे नुकसान सहन करावे लागेल. यासोबतच टी-२० वर्ल्डकपसाठीही बीसीसीआयला उत्पन्न मिळवायचे आहे. वर्ल्ड कपसाठी करातून सूट मिळावी, याबाबत सरकार आणि बीसीसीआयमध्ये चर्चाही सुरु आहे. याबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर सरकारने करात १० टक्के सूट दिली तर बीसीसीआयला सुमारे २२६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. जर कोणतीही सूट मिळाली नाही तर वर्ल्ड कपसाठी ९०६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. जर IPL रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर त्याचा मोठा फटका भारतीय क्रिकेट विश्वाला बसण्याची शक्यता आहे.