मुंबई प्रिमीयर लीग T-20 स्पर्धेला कोरोनाचा मोठा फटका, मालिका भरवणार नसल्याचं पत्रक जारी

सध्या कोव्हिड प्रादुर्भावामुळे यंत्रणांवर असलेला ताण लक्षात घेत मालिकेचा तिसरा सिझन तूर्त न आयोजित करण्याचा निर्णय मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association – MCA) अध्यक्ष विजय पाटील यांनी संयुक्तपणे घेतला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरुन यांसंबंधी माहिती दिली. 

    मुंबई : मुंबई प्रीमिअर लीग T20 क्रिकेट मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोव्हिड प्रादुर्भावामुळे एमपीएलचा तिसरा सिझन पुढे ढकलल्याची माहिती मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी दिली. नार्वेकरांची चेअरमनपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.