फुटबॉलचा ‘बादशाहा’ही कोरोनाच्या विळख्यात ;क्रिस्टियानो रोनाल्डो पॉझिटिव्ह

पोर्तुगीज : जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू आणि फुटबॉलचा बादशाहा क्रिस्टियानो रोनाल्डो याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पोर्तुगाल फुटबॉल महासंघाने या गोष्टीची पुष्टी केली आहे.

पोर्तुगीज : जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू आणि फुटबॉलचा बादशाहा क्रिस्टियानो रोनाल्डो याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पोर्तुगाल फुटबॉल महासंघाने या गोष्टीची पुष्टी केली आहे. फेडरेशनने मंगळवारी सांगितले की, रोनाल्डोची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. रोनाल्डाचे प्रकृती स्थिर असून त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

रोनाल्डोला बुधवारी स्वीडनविरोधात पोर्तुगाल नेशन्स लीग मॅचमधून बाहेर गेले होते. सध्या रोनोल्डोला लक्षणं दिसत नसल्यामुळे त्याला
क्वारंटाईन करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.