कोरोना प्रकोपामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द , काही खेळाडू आणि स्टाफला कोरोनाची लागण ;  BCCI चा मोठा निर्णय

कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातही कोरोना धडकला आहे.

    कोरोना प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी आयपीएल स्पर्धा रद्द करत असल्याची माहिती दिली आहे.

    कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातही कोरोना धडकला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

    मागील दोन दिवसांमध्ये खेळाडू वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, रिद्धिमान साहा, अमित मिश्रा आणि बॉलिंग कोच बालाजी सहित ८  खेळाडू आणि २ कोचिंग स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आयपीएल रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.