क्रिकेटच्या देवाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, कोरोना झाल्यानंतर केलं होतं दाखल!

तेंडुलकरसह इंडिया लीजेंड्सचे ४ खेळाडूंना कोविड -१ पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पाठोपाठ यूसुफ पठाण, एस. बद्रीनाथ आणि इरफान पठाण यांनाही कोरोनाची लागण झाली.

    क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कोरोनातून बरा झाला आहे. त्याला गुरुवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्याने स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला २ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २७ मार्चला त्याला कोरोनाची लागण झाली होती. सुरूवातीला त्याला होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

    सचिन तेंडूलकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मी नुकताच दवाखान्यातून घरी आलो आहे आणि अजूनही एकांत राहून विश्रांती घेईन.” शुभेच्छा आणि प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. मी खरोखर भारावून गेलो आहे. ‘

    त्यांनी रुग्णालयात त्यांची चांगली काळजी घेतल्याबद्दल वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत. तेंडुलकर म्हणाला, ‘मी अशा सर्व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानतो ज्यांनी माझी चांगली काळजी घेतली आणि या कठीण परिस्थितीतही एका वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत आहे.’

    तेंडुलकरसह इंडिया लीजेंड्सचे ४ खेळाडूंना कोविड -१ पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पाठोपाठ यूसुफ पठाण, एस. बद्रीनाथ आणि इरफान पठाण यांनाही कोरोनाची लागण झाली.