आयपीएलसाठी क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता ?

कोरोनाच्या संकटाचा सर्वांनाच सामना करावा लागतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य वातावरणात आयपीएलच्या लढती होऊ शकत नाहीत, पण स्टेडियममध्ये कमीतकमी प्रेक्षक असायला हवेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीसीसीआयशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

यूएईत आयपीएल २०२० ची सुरूवात पुढील महिन्यात होणार आहे. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धेतील लढती प्रेक्षकांविना होणार असल्याची चर्चा मागील दिवसांपासून होती. मात्र आता युऐईत क्रिकेट बोर्ड स्टेडियममध्ये कमी प्रमाणात क्रिकेटप्रेमींना प्रवेश देण्याचा विचार करीत आहे असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटाचा सर्वांनाच सामना करावा लागतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य वातावरणात आयपीएलच्या लढती होऊ शकत नाहीत, पण स्टेडियममध्ये कमीतकमी प्रेक्षक असायला हवेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीसीसीआयशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. असे ईसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

दरम्यान,  काल शुक्रवारी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आयपीएल खेळण्यासाठी यूएईला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ पुढल्या आठवडय़ात यूएईकडे रवाना होण्याची शक्यता आहे.