हिटमॅन रोहित शर्मासोबत क्रिकटवेड्याने घेतला पंगा, पैज हरल्याने ‘तो’ झाला अर्धा नंगा

रोहित शर्माच्या कसोटीतील प्रतिभावरून आणि खेळण्यावरून एका क्रिकेटवेड्याने अर्धी मिशी काढेन, अशी पैज लावली होती. परंतु रोहितसोबत घेतलेला पंगा त्याला चांगलाच महागात पडला असून तो क्रिकेटवेडा अर्धा नंगा झाला आहे. म्हणजेच काय तर.. पैज हरल्यामुळे त्या व्यक्तीने आपली अर्धी मिशी काढली आहे. त्यामुळे हा फोटो सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. तसेच ट्विटरवरील या व्यक्तीचं नाव अजय असल्याचं समजतेय.

भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India and Australia ) यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माचं (hitman Rohit Sharma) संघात पुनरागमन झालं आहे. तसेच रोहितला कसोटी सामन्यात उपकर्णधार करण्यात आलं आहे. परंतु रोहित शर्माच्या कसोटीतील प्रतिभावरून आणि खेळण्यावरून एका क्रिकेटवेड्याने अर्धी मिशी काढेन, अशी पैज लावली होती. परंतु रोहितसोबत घेतलेला पंगा त्याला चांगलाच महागात पडला असून तो क्रिकेटवेडा अर्धा नंगा झाला आहे. म्हणजेच काय तर.. पैज हरल्यामुळे त्या व्यक्तीने आपली अर्धी मिशी काढली आहे. त्यामुळे हा फोटो सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. तसेच ट्विटरवरील या व्यक्तीचं नाव अजय असल्याचं समजतेय.

सिडनी कसोटी सामन्याआधी भूषण कदम या क्रीडा चाहत्यानं आपल्या ट्विटवर रोहित शर्माच्या समावेशाबाबत प्रश्न विचारला होता. रोहित शर्माला तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यासाठी कोणाला डच्चू देण्यात यावा? असा प्रश्न विचाराला होता. या प्रश्नावर @Ajay81592669 या युजरने ‘रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम पुरुष आहे. ब्रॉड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो, असं म्हटलं होतं.


दरम्यान, क्रिकेटवेड्याने दिलेला शब्द पाळला असून त्यांनी पैज हरल्यामुळे चक्क अर्धी मिशी काढली. अर्ध्या मिशीवरील फोटो अजयनं आपल्या ट्विटवर पोस्ट केला आहे.