टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेवर कोरोना विषाणूचे संकट ; प्रेक्षकांच्या अनुपस्थित होणार स्पर्धा?, ‘या’ दिवशी होणार स्पर्धेला सुरूवात…

टोक्यो ऑलम्पिक स्पर्धा यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान पार पडणार आहे. यावेळी परदेशी प्रेक्षकांना प्रवेश मिळणार नसून आता स्थानिक प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. 

    टोक्यो : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचे संकट घोंघावत आहे. जपानमधील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटामुळे यंदा टोक्योमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धा प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होणार असल्याची माहिती जपानच्या एका वृत्तपत्राने दिली आहे.

    जपानमध्ये आपात्कालीन परिस्थिती असून पुन्हा काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहेत. या परिस्थितीचा विचार करता टोक्यो ऑलम्पिक पार पाडण्यासाठी प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवण्याचा विचार असल्याती माहिती मिळाली आहे. ऑलम्पिक स्पर्धा सुरु होणार असल्याने पुन्हा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू नयेत यासाठी जपानमध्ये निर्बंधाची घोषणा करण्यात आली.

    तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत आज गुरुवारी सकाळी झालेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांंनी २२ ऑगस्टपर्यंत जपानमध्ये आपातकाल लागू केला आहे. त्यामुळे ऑलम्पिक स्पर्धा यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान पार पडणार आहे. यावेळी परदेशी प्रेक्षकांना प्रवेश मिळणार नसून आता स्थानिक प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.  स्थानीक आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितिसह अन्य प्रतिनिधी उद्या शुक्रवारी  महत्त्वाची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत.

    टोक्योत मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ऑलम्पिक खेळांतून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने टॉर्च रिले सार्वजनिक ठिकाणी समाप्त करण्याचा निर्णय घेतला.