ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटसला सलग नवव्यांदा सिरी-एचं विजेतेपद

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या उत्तम कारगिरीमुळे युव्हेंटसला सलग नवव्यांदा सिरी-एचं विजेतेपद मिळालं असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी युव्हेंटसने सॅम्पडोरियाचा पराभव करून २-० असा विजय मिळवला आहे.  कोरोनानंतर युरोपमधील पाच प्रतिष्ठेच्या लीगमध्ये १० पेक्षा जास्त गोल पटकावणारा रोनाल्डो हा एकमेव फु टबॉलपटू ठरला आहे. तसेच इटलीतील दुसऱ्या सीझनमध्ये ३० सामन्यांत ३० गोलचा टप्पा त्याने ओलांडला आहे. 

विक्रम महत्त्वाचे असतातच, पण त्याहीपेक्षा संघाचे विजेतेपद महत्त्वाचे असते. दोन्ही गोष्टी एकत्र घडून आल्या की आनंद हा होणारच, असं ख्रिस्तियानो रोनाल्डो यांने सांगतिले. रोनाल्डोला आता सिरी-ए फुटबॉल स्पर्धेत युव्हेंटसतर्फे  सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी फक्त एका गोलची गरज आहे. तसेच फे लिस बोरेल यांनी १९३३-३४ मध्ये हा विक्रम नोंदवला होता.