दिल्ली आणि हैदराबाद येणार आमनेसामने,  मुंबई इंडियन्स विरुद्ध मिळालेल्या विजयानंतर दिल्लीच्या संघाचा आत्मविश्वास वाढला

मुंबई इंडियन्स विरुद्ध मिळालेल्या विजयानंतर दिल्लीच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे हाच आत्मविश्वास सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही कायम ठेवण्याचा दिल्लीचा प्रयत्न असणार आहे.

    दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी त्यांचा संघ चेन्नईच्या धीम्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा कसा सामना करतो हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध मिळालेल्या विजयानंतर दिल्लीच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे हाच आत्मविश्वास सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही कायम ठेवण्याचा दिल्लीचा प्रयत्न असणार आहे.

    दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेल कोरोनाग्रस्त झाल्यानं संघाबाहेर आहे. पण आता तोही पूर्णपणे फिट झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या संतुलित संघ आहे. अक्षर पटेल देखील संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. गेल्या सीझनमध्ये दिल्लीच्या संघाला फायनलपर्यंत घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. अक्षर, मिश्रा आणि अश्विन यांनी एकत्र खेळणं आमच्यासाठी स्वप्नवत ठरेल, असं कैफ म्हणाले.