दिल्लीची चेन्नईवर ४४ धावांनी मात, चेन्नईचा सलग दुसरा पराभव

दिल्लीने चेन्नईला विजयासाठी १७६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १३१ धावाच करता आल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर एनरिच नॉर्तजेने २ विकेट घेत रबाडाला चांगली साथ दिली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि गब्बर शिखर धवनने दिल्लीला चांगली सुरुवात दिली.

दुबई : आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) हंगामात काल शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल (CSK VS DC)  यांच्यात सामना झाला. यामध्ये चेन्नईने नाणेफेक जिंकून (CSK WIN THE TOSS) दिल्लीला बॅटिंग करण्यास भाग पाडले. फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीची धमाकेदार सुरुवात झाली.दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नईवर ४४ धावांनी मात केली आहे.

दिल्लीने चेन्नईला विजयासाठी १७६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १३१ धावाच करता आल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर एनरिच नॉर्तजेने २ विकेट घेत रबाडाला चांगली साथ दिली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि गब्बर शिखर धवनने दिल्लीला चांगली सुरुवात दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची सलामी भागीदारी केली.

त्यानंतर दिल्लीने दिलेल्या विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईने सावध सुरुवात केली. सलामीवीर मुरली विजय आणि शेन वॉटसनने २३ धावा केल्या. यानंतर शेन वॉटसन १४ धावा करुन बाद झाला. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी १५ आणि १२ धावा केल्या.