दिल्लीचा कोलकातावर विजय , केली १८ धावांनी मात

दिल्लीने कॅपिटल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) १८ धावांनी मात केली आहे. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी २२९ धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून २१० धावाच (Runs) करता आल्या.

दिल्लीने कॅपिटल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) १८ धावांनी मात केली आहे. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी २२९ धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून २१० धावाच (Runs) करता आल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून कर्णधार श्रेअस अय्यर आणि वेगवान फलंदाज पृथ्वी शॉ या दोन फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी केली.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. कोलकाताने ८ धावांवर पहिली विकेट गमावली. सुनील नारायण ३ धावांवर आऊट झाला. कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक ५८ धावा केल्या. तर इयन मॉर्गनने ४४ धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने ३ विकेट्स घेतल्या. यामुळे कोलकाताची ११७-५ अशी परिस्थिती झाली मॉर्गन बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याला यात यश आले नाही. राहुल त्रिपाठीही बाद झाला. त्याने १६ चेंडूत ३६ धावांची शानदार खेळी केली. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने ३ विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलने २ विकेट्स घेतल्या.