IPL मधून ‘हे’ खेळाडू माघार घेण्याची शक्यता ; दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद संघाला मोठा फटका बसणार

भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ऑस्ट्रेलिया प्रशासनाकडून भारतातून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून बंदीची घोषणा होण्याआधीच वॉर्नर आणि स्मिथ मायदेशी परतण्याच्या विचारात असल्याचं समजतं.

    इंडियन प्रीमियर लीगचं (IPL) यंदाचं १४ वं सीझन सुरू असून देशातील वाढत्या कोरोनाचं संकट आता स्पर्धेवरही येण्याची शक्यता आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीपासून ते आतापर्यंत चार परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएलमधून माघार घेऊन लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला परतण्याची शक्यता आहे. याआधीच ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेटपटूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

    यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांच्यासोबत राजस्थान रॉयल्सचा अँड्रयू टाय यांचा समावेश आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ऑस्ट्रेलिया प्रशासनाकडून भारतातून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून बंदीची घोषणा होण्याआधीच वॉर्नर आणि स्मिथ मायदेशी परतण्याच्या विचारात असल्याचं समजतं.

    इतकंच नव्हे, तर खेळाडूंसोबतच आयपीएलमध्ये सहभागी असलेले ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक, समालोचक अशा एकूण ३० ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी आयपीएलमधून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.