२०२२ च्या आयपीएलमधून धोनी माघार घेण्याची शक्यता, जर धोनी पुढच्या हंगामात खेळणार नसेल तर..; रैनाने केला मोठा खुलासा

रैनाने एका प्रसार माध्यमातून सांगितलं की, जर धोनी पुढच्या हंगामात खेळणार नसेल तर मी सुद्धा माघार घेणार आहे. २००८ पासून मी त्याच्यासोबत खेळत आहे आणि त्याच्यासोबतच लीग मधून माघार घेईन.

    चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आयपीएल २०२२ च्या पुढील हंगामातून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान टीमचे मिडल आणि वेगवान फलंदाज सुरेश रैनाने त्याच्या खेळाबाबत मोठं वक्तव्य आणि खुलासा केला आहे.

    रैनाने सांगितलं की, जर चेन्नईने आयपीएल २०२१ ची ट्रॉफी जिंकली. तरच मी माहीला पुढच्या हंगामात खेळण्यासाठी त्याची समजूत घालणार आहे. मात्र, रैनाच्या या वक्तव्यानंतर असं समजलं जात आहे की, यंदाची ट्रॉफी चेन्नईने गमावली तर पुढच्या हंगामातून धोनी निवृत्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने २०२० मध्येच संन्यास घेतला होता.

    रैनाने एका प्रसार माध्यमातून सांगितलं की, जर धोनी पुढच्या हंगामात खेळणार नसेल तर मी सुद्धा माघार घेणार आहे. २००८ पासून मी त्याच्यासोबत खेळत आहे आणि त्याच्यासोबतच लीग मधून माघार घेईन. जर चेन्नईने आयपीएल २०२१ ची ट्रॉफी जिंकली. तरच मी माहीला पुढच्या हंगामात खेळण्यासाठी त्याची समजूत घालणार आहे.

    मला क्रिकेट खेळण्यासाठी अजून ४ ते ५ वर्ष बाकी आहेत. या वर्षी आम्हाला आयपीएल खेळायचं आहे. त्यानंतर पुढच्या दोन हंगामात २ नवीन संघ उभारण्यात येणार आहेत. परंतु मी जोपर्यंत आयपीएलमध्ये आहे. तोपर्यंत मी याच संघातून खेळणार आहे. मला असं वाटतयं की, यंदाच्या हंगामात आम्ही चांगलं आणि उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतो.