सलामीच्या पहिल्याच सामन्यात मुंबईला हरवून धोनीचा विक्रम

सलमीच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI)  मात करत विजय मिळवला आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. २०१८पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या (UAE)  मैदानावर मुंबईला धूळ चारली.

आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020)  हंगामाला सुरूवात झाली असून सलमीच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI)  मात करत विजय मिळवला आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. २०१८पासून सलग पाच वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या चेन्नईने अखेर युएईच्या (UAE)  मैदानावर मुंबईला धूळ चारली.

सौरभ तिवारीच्या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू (७१) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५८) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. या विजयासह IPLमध्ये महेंद्रसिंग धोनी एक विक्रम केला. चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करताना हा धोनीचा १००वा विजय ठरला. एखाद्या संघाचे नेतृत्व करताना १०० विजय मिळवणारा धोनी IPL इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे.

महेंद्रसिंग धोनीने (MS DHONI) मुंबईला सलामीच्या सामन्यात पराभूत करून इतिहास रचला. मुंबई इंडियन्सचा वेगवान फलंदाज सौरभ तिवारीच्या उत्कृष्ट खेळीमुळे मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एन्ट्री घेतली असता तो १२ धावा काढून झेलबाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉकही ३३ धावांवर माघारी परतला.