dinesh kartik

मॅच(match) सुरू असताना बॅट्समन परिस्थितीनुसार वेगवेगळ्या बॅटचा वापर करतात. यावर दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik) टोला हाणला.

    मुंबई:विकेट कीपर बॅट्समन दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) कॉमेंट्रीच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकत आहे. दिनेश कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये स्काय स्पोर्ट्ससाठी (Sky Sports) कॉमेंट्री करत आहे. भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर तो आता इंग्लंड-श्रीलंका (England vs Sri Lanka) सीरिजसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतो. इंग्लंड-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या वनडेदरम्यान कार्तिकने केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याच्यासोबत असलेले कॉमेंटेटर आनंदी झाले खरे, पण त्याच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो.


    मॅच सुरू असताना बॅट्समन परिस्थितीनुसार वेगवेगळ्या बॅटचा वापर करतात. यावर कार्तिकने टोला हाणला. ‘‘बहुतेक बॅट्समनना आपली बॅट आवडत नाही, त्यांना दुसऱ्या बॅट्समनची बॅट आवडते. बॅट शेजाऱ्याच्या पत्नीसारखी असते, जी कायमच तुम्हाला आवडते,’’ असं कार्तिक कॉमेंट्री करताना म्हणाला.

    कार्तिकचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे आणि अनेकांनी त्याचं हे वक्तव्य मुरली विजयशी (Murali Vijay) जोडलं. दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीचं मुरली विजयसोबत अफेअर होतं. कार्तिकला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने निकिताला घटस्फोट दिला. यानंतर मुरली विजयने निकितासोबत लग्न केलं. तर कार्तिक ६ वर्षांपूर्वी स्क्वॉश खेळाडू दिपीका पल्लीकलसोबत विवाह बंधनात अडकला.

    दिनेश कार्तिकने त्याच्या कॉमेंट्रीची धडाक्यात सुरुवात केली आहे. चाहत्यांसोबतच सहकारी कॉमेंटेटरही त्याच्या कॉमेंट्रीवर खूश आहेत. लोकप्रिय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधल्या दिनेश कार्तिकच्या कॉमेंट्रीचं कौतुक केलं.