कोरोनाची लागण झालेल्या जोकोविचने सांगितले ‘हे’ कारण…

जागतिक प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला काल मंगळवारी कोरोनाची लागण झाली होती. परंतु ही लागण कशामुळे झाली, यासंबधातील माहिती समोर आली आहे. सर्बिया क्रोएशिया येथील आड्रिया टूर टेनिस स्पर्धेत

 जागतिक प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला काल मंगळवारी कोरोनाची लागण झाली होती. परंतु ही लागण कशामुळे झाली, यासंबधातील माहिती समोर आली आहे. सर्बिया क्रोएशिया येथील आड्रिया टूर टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचने सहभाग घेतला होता. परंतु या कार्यक्रमामुळे  काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी केली होती. परंतु कोरोना चाचणीचा अहवाला पॉझिटिव्ह आला असता, जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे त्याच्या पार्टितला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जोकोविच आणि इतर सहकारी खेळाडू एका पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. परंतु सोशल डिन्स्टन्सिंगचे अजिबात पालन झालेले नसल्याचेही स्पष्ट दिसत आहे. ज्या-ज्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे, ते लवकर तंदुरूस्त व्हावेत हीच प्रार्थना.असं मत कार्गिओसने मांडल आहे.