जोकोविचचे स्वप्न भंगले ; रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले ‘ग्रँडस्लॅम’

जोकोविचचे कॅलेंडर स्लॅम बनण्याचे स्वप्नही अपुरेच राहिले. जोकोविचने आतापर्यंत फ्रेंच ओपन, विम्बल्डन, ऑस्ट्रेलिया ओपन या तीनही ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. तब्बल २ तास १५ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यातील फेरीत मेदवेदेवने तिन्ही सेटमध्ये ६-४,६-४, ६-४ असा पराभव करून यूएस ओपनचे जेतेपद पटकावले.

  यूएस ओपनच्या (US Open)रविवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत नंबर १ असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) रशियाच्या डॅनिल मेदवेदेव (Daniel Medvedev)कडून पराभूत व्हावे लागले. यामुळे जोकोविचचे कॅलेंडर स्लॅम बनण्याचे स्वप्नही अपुरेच राहिले. जोकोविचने आतापर्यंत फ्रेंच ओपन, विम्बल्डन, ऑस्ट्रेलिया ओपन या तीनही ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. तब्बल २ तास १५ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यातील फेरीत मेदवेदेवने तिन्ही सेटमध्ये ६-४,६-४, ६-४ असा पराभव करून यूएस ओपनचे ‘ग्रँडस्लॅम'(Grand Slam) पटकावले.

  जिंकल्यानंतर डॅनिल मेदवेदेव आपली टीम , पालक आणि कुटुंबीय तसेच प्रेक्षकांचे आभार मानले. स्लॅम जिंकण्याचा प्रवास सोपा नाही. या प्रवासात मला मदत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो,अशी भावना त्याने व्यक्त केली.

  डॅनिल मेदवेदेव

  जोकोविचला नदाल आणि फेडररचे रेकॉर्ड मोडणे झाले अशक्य
  जोकोविचला सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी होती, पण मेदवेदेवला हरवल्यानंतर तो राफेल नदाल, आणि रॉजर फेडररच्या पुढे जाऊ शकला नाही तो सध्या स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्याशी बरोबरीत आहे. या तिघांची नावे २०-२० ग्रँडस्लॅम आहेत.

  मेदवेदेवने मोसमातील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले
  मेदवेदेवचे हे हंगामातील पहिले ग्रँडस्लॅम. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला त्याला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविच विरुद्धच्या पराभवाला सामोरे जावे लागले. फ्रेंच ओपनमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रवास केला, तर विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत पोहोचला.

  सर्वाधिक ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदे
  जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वाधिक यश मिळाले आहे. त्याने आतापर्यंत ९ वेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. त्याने ६ वेळा विम्बल्डन आणि तीन वेळा यूएस ओपन जिंकले आहे. फ्रेंच ओपनमध्ये त्याने सर्वात कमी विजेतेपद पटकावले आहेत. पॅरिसमध्ये तो दोन वेळा चॅम्पियन बनू शकला आहे.