Either won the match; Kolkata beat Punjab by 5 wickets

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेतील 21 वा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)यांच्यात लढत झाली. कोलकात्याने पंजाबवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

    अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेतील 21 वा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)यांच्यात लढत झाली. कोलकात्याने पंजाबवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

    नाणेफेक जिंकून कोलकता ने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकताच्या गोलंदाजीसमोर पंजाबची फलंदाजी फिकी पडली. कोलकताकडून प्रसिद्ध कृष्णा ने सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या तर पॅट कमिन्स आणि सुनील नारायणने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.तर चक्रवर्ती आणि शिवम मावी ने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.पंजाबने निर्धारीत 20 ओव्हर्स मध्ये फक्त 123 धावा बनवल्या.

    124 धावांच लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता कडून मॉर्गन ने सर्वात जास्त म्हणजे नाबाद 40 चेंडूत 47 धावा तर राहूल त्रिपाठीने 32 चेंडूत 41 धावा ठोकल्या. या धावांच्या मदतीने कोलकाताने सहजपणे 124 धावांच लक्ष्य पार केल.
    कोलकाताने पंजाबला 5 विकेट्स ने मात दिली.