इंग्लंड ऑलआऊट, न्यूझीलंडचा दणदणीत विजय ; भारताचं टेन्शन वाढवलं

न्यूझीलंडने इंग्लंडचा (England vs New Zealand) दुसऱ्या टेस्टमध्ये अगदी सहज पराभव केला आहे. याचसोबत न्यूझीलंडचा या सीरिजमध्ये 1-0 ने विजय झाला आहे.  शेवटच्या इनिंगमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी फक्त 38 रनची गरज होती. हे आव्हान किवींनी दोन विकेट गमावून पूर्ण केलं.

    बर्मिंघम : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमने भारताचं टेन्शन वाढवलं आहे. न्यूझीलंडने इंग्लंडचा (England vs New Zealand) दुसऱ्या टेस्टमध्ये अगदी सहज पराभव केला आहे. याचसोबत न्यूझीलंडचा या सीरिजमध्ये 1-0 ने विजय झाला आहे.  शेवटच्या इनिंगमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी फक्त 38 रनची गरज होती. हे आव्हान किवींनी दोन विकेट गमावून पूर्ण केलं.

    त्याआधी इंग्लंडचा आज दिवसाच्या पहिल्याच बॉलला ऑल आऊट झाला. 122 रनवर इंग्लंडची संपूर्ण टीम माघारी परतल्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 38 रनचं आव्हान मिळालं. किवींकडून मॅट हेन्री (Mat Henry) आणि नील वॅगनरला (Neil Wagner) सर्वाधिक 3-3 विकेट मिळाल्या, तर बोल्ट (Trent Boult) आणि एझाज पटेल (Azaz Patel) याला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं.

    इंग्लंडकडून नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मार्क वूडने (Mark Wood) सर्वाधिक 29 रनची खेळी केली. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या इनिंगमध्ये 303 रन केले. रोरी बर्न्स आणि लॉरेन्स यांनी प्रत्येकी 81-81 रनची खेळी केली.