इंग्लंडच्या फास्ट बॉलरचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, सरेमध्ये घेतला अखेरचा श्वास

इंग्लंडचे माजी फास्ट बॉलर जो बेंजामिन यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते ६० वर्षांचे होते. १९९४ मध्ये त्यांनी इंग्लंडलाठी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु इंग्लंडच्या सरेमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

    मुंबई: इंग्लंडचे माजी फास्ट बॉलर जो बेंजामिन यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते ६० वर्षांचे होते. १९९४ मध्ये त्यांनी इंग्लंडलाठी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु इंग्लंडच्या सरेमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बेंजामिन यांचं आतंरराष्ट्रीय करियर फार चाललं नाही, पण काऊंटी क्रिकेटमध्ये ते बराच काळ खेळले आणि विकेटही घेतल्या. सरे क्रिकेट क्लबने मंगळवारी रात्री त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बेंजामिन यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे.

    बेंजामिन यांचा जन्न १९६१ साली कॅरेबियन बेट असलेल्या सेंट किट्समध्ये झाला होता. १५ व्या वर्षी ते कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये आले. यानंतर त्यांनी वार्विकशायर काऊंटीकडून खेळताना आपल्या क्रिकेट करियरची सुरूवात केली. वार्विकशायरकडून त्यांनी १९८८ साली करियरची सुरूवात केली, पण त्यांना फार यश मिळालं नाही. यानंतर १९९२ साली ते सरेकडून खेळायला लागले. इकडूनच त्यांच्या करियरने झेप घेतली आणि त्यांना इंग्लंडच्या टीममध्ये स्थान मिळालं.

    लंडनच्या ओव्हलमध्ये आपल्या घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये त्यांनी पहिल्या इनिंगमध्येच त्यांनी ४ विकेट घेतल्या. यामध्ये केपलर वेसल्स आणि हॅन्सी क्रोनिये यांच्यासारख्या मोठ्या बॅट्समनचा समावेश होता. पण यानंतर त्यांना टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी वनडे क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. पण दोन मॅचमध्ये त्यांना फक्त एक विकेट मिळाली आणि त्यांना मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही.