इंग्लंडचे ६१ धावांवर २ गडी बाद, लंचपर्यंत टीम इंडियाचं सामन्यावर वर्चस्व

भारतीय गोलंदाजानी रॉरी आणि क्रॉली या दोघा इंग्लंडच्या सलामीवीरांना तंबूत धाडत इंग्लंडची ६१  धावावंर २ विकेट अशी अवस्था केली आहे. बुमराह आणि सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

    पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशन संपलं आहे. टीम इंडियाने या सेशनमध्ये भेदक गोलंदाजी करत सामन्यात दबदबा निर्माण केला आहे. भारतीय गोलंदाजानी रॉरी आणि क्रॉली या दोघा इंग्लंडच्या सलामीवीरांना तंबूत धाडत इंग्लंडची ६१  धावावंर २ विकेट अशी अवस्था केली आहे. बुमराह आणि सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

    इंग्लंडचा कर्णधार जो रुटने फलंदाजीला येकत अप्रतिम तीन सलग चौकार ठोकले. नुकतीच विकेट मिळवलेल्या मोहम्मद सिराजला रुटने हे चौकार खेचले.

     

    टीम इंडियाने संघामध्ये धमाकेदार सुरूवात केली असून इंग्लंडच्या पहिल्याच सलामीवीरला पहिल्याच फटक्यात शून्यावर बाद केलं आहे. इंग्लंड संघाचा सलामीवीर रॉरी बर्न्सला शून्यावर बाद करत तंबूत धाडलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला पायचीत केलं आहे.