टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या २ कसोटींसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, सामना कधी आणि कुठे होणार?

४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या ५ कसोटी सामन्यांंच्या मालिकेसाठी जो रूटकडे इंग्लंडच्या टीमचं नेतृत्त्व करण्यात येणार आहे.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) दुसऱ्या सत्राची दोन्ही टीमची ही पहिलीच मालिका असणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

  लंडन : टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या २ मालिकांसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या ५ कसोटी सामन्यांंच्या मालिकेसाठी जो रूटकडे इंग्लंडच्या टीमचं नेतृत्त्व करण्यात येणार आहे.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) दुसऱ्या सत्राची दोन्ही टीमची ही पहिलीच मालिका असणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

  इंग्लंड स्क्वाडमध्ये कोणाची वर्णी

  जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉली, सॅम कुर्रान, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ले, बेन स्टोक्स , मार्क वुड. अशी १७ जणांची टीम जाहीर करण्यात आली आहे.

  भारत-इंग्लंड सीरिजचं वेळापत्रक

  पहिली टेस्ट : ट्रेन्ट ब्रिज, ४ ऑगस्टपासून

  दुसरी टेस्ट : लॉर्ड्स, १२ ऑगस्टपासून

  तिसरी टेस्ट : हेडिंग्ली, २५ ऑगस्टपासून

  चौथी टेस्ट : ओवल, २ सप्टेंबरपासून

  पाचवी टेस्ट : ओल्ड ट्रॅफर्ड, १० सप्टेंबरपासून