पाकिस्तानच्या PMला इंटरनॅशनल झटका, न्यूझीलंडनंतर ‘या’ टीमने दौरा केला रद्द…

पाकिस्तानमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup) होणार आहे. इंग्लंडचा क्रिकेट संघ (Pakistan Vs England )ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. शुक्रवारी न्यूझीलंडने सामना सुरू होण्याच्या आधी दौराच रद्द केला. आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने देखील अशाच पद्धतीचे वक्तव्य केले आहे.

    नवी दिल्ली: न्यूझीलंड क्रिकेट संघाने (Pakistan Vs New Zealand ) पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर आणखीन एका संघाने पाकचा दौरा रद्द केला आहे. पाकिस्तानमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup) होणार आहे. इंग्लंडचा क्रिकेट संघ (Pakistan Vs England )ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. शुक्रवारी न्यूझीलंडने सामना सुरू होण्याच्या आधी दौराच रद्द केला. आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने देखील अशाच पद्धतीचे वक्तव्य केले आहे.

    ईसीबीने जारी केलेल्या एका पत्रकानुसार, ऑस्टोबरमध्ये होणाऱ्या पाक दौऱ्याबद्दल आम्ही विचार करत आहोत. येत्या ४८ तासात आम्ही निर्णय कळवू. इंग्लंडचा संघ १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी टी-२० सामना खेळणार आहे. त्यानंतर वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे.

    पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला न्यूझीलंडच्या संघाने मोठा धक्का दिला . १८ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाने पहिला सामना खेळण्यापूर्वीच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातल्या वन-डे मालिकेला कालपासून सुरुवात होणार होती. पण, दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आलेच नाही. न्यूझीलंड सरकारनं सुरक्षेबाबत अलर्ट दिल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला.