टीम इंडियाची धमाकेदार सुरूवात, इंग्लंडला पहिला झटका ; आलेल्या पाहुण्यांना माघारी धाडलं

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series) यांच्यातील पहिली टेस्ट मॅच नॉटिंघममध्ये सुरु झाली आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला आहे.

    नॉटिंघम : टीम इंडियाने संघामध्ये धमाकेदार सुरूवात केली असून इंग्लंडच्या पहिल्याच सलामीवीरला पहिल्याच फटक्यात शून्यावर बाद केलं आहे. इंग्लंड संघाचा सलामीवीर रॉरी बर्न्सला शून्यावर बाद करत तंबूत धाडलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला पायचीत केलं आहे.

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series) यांच्यातील पहिली टेस्ट मॅच नॉटिंघममध्ये सुरु झाली आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला आहे.

    टीम इंडियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) खेळलेल्या टीममध्ये तीन बदल केले आहेत. यापैकी शुभमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त असल्यानं त्याच्या जागी केएल राहुलचा (KL Rahul) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. राहुलने सराव सामन्यातमध्ये शतक करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे.

    दोन देशांमध्ये सहा महिन्यांपूर्वी झालेली टेस्ट सीरिज टीम इंडियाने ३-१ ने जिंकली होती. आता इंग्लंडमध्ये या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न यजमान टीम करणार आहे. तर टीम इंडियाला १४ वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची चांगली संधी या सीरिजमध्ये आहे.