टीम इंडिया विरुद्ध इंग्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासूुन सुरूवात, कधी होणार ?

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारी ४ ऑगस्ट रोजी नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानात खेळवला जाईल. तसेच भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून ३ वाजता नाणेफेक करण्यात येईल आणि पहिला कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

  नॉटिंघम : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघ या सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडशी (India vs England) भिडणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपच्या दुसऱ्या पर्वातील हा पहिलाच सामना आहे.

  टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारी  ४ ऑगस्ट रोजी नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानात खेळवला जाईल. तसेच भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून ३ वाजता नाणेफेक करण्यात येईल आणि पहिला कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

   सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

  • पहिला कसोटी सामना ४ ते ८ ऑगस्ट (नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज येथे)
  • दुसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑगस्ट (लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर)
  • तिसरा कसोटी सामना २५ ते २९ ऑगस्ट (हेडिंग्ले)
  • चौथा कसोटी सामना २ ते ६ सप्टेंबर (द ओवल)
  • पाचवा कसोटी सामना १० ते १४ सप्टेंबर (मॅनचेस्टर)

  पहिल्या टेस्टसाठी संभाव्य भारतीय संघ

  केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.