प्रसिद्ध गोल्फर टाइगर वुड्स यांच्या कारला अपघात ; जखमी वुड्स यांच्यावर उपचार सुरु

टायगर वुड्सची गणना जगातील सर्वोत्कृष्ट गोल्फपटूंमध्ये केली जाते. त्यांनी आतापर्यंत १५ प्रमुख गोल्फ स्पर्धा जिंकल्या आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टायगर वुड्सच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी बुधवारी ट्विट केले की, वुड्स हे जगातील उत्कृष्ट खेळाडू असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे

    प्रसिद्ध गोल्फर टाइगर वुड्स यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या लॉस एंजिल्स येथे मंगळवारी हा अपघात घडला आहे. या अपघातात टाइगर वुड्स यांच्या पायाला दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लॉस एंजेलिस काउंटी शेरीफच्या डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, कार अपघातानंतर वुड्स यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना गाडीतून बाहेर निघण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. अपघातावेळी टायगर वुड्स हे गाडीमध्ये एकटे होते.वुड्स वेगाने कार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार दुभाजकाला जाऊन धडकली.

     

    टायगर वुड्स यांची कारकीर्द
    टायगर वुड्सची गणना जगातील सर्वोत्कृष्ट गोल्फपटूंमध्ये केली जाते. त्यांनी आतापर्यंत १५ प्रमुख गोल्फ स्पर्धा जिंकल्या आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टायगर वुड्सच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी बुधवारी ट्विट केले की, वुड्स हे जगातील उत्कृष्ट खेळाडू असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.