फिफा विश्वचषक स्पर्धा : फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली पात्र

ओस्माने डेम्बेलेने केलेल्या गोलला सर्थी मॅल्यीच्या स्वयंगोलची साथ लाभल्याने फ्रान्सने कझाकस्तानला २-० असे पराभूत केले. स्पेनने जॉर्जिआवर २-१ अशी मात करताना चौथ्या गटातील अग्रस्थानासह विश्वचषकात स्थान मिळवले आहे. सर्जिओ गनाब्रीने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर जर्मनीने रोमानियावर १-० अशी मात केली. पहिल्या गटात आघाडीवर असलेल्या इटलीने बल्गेरियाला २-० असे नमवले.

    लंडन : गतविजेत्या फ्रान्ससह जर्मनी, स्पेन, इटली हे युरोप खंडातील माजी विजेते रविवारी कतार येथे २०२२  मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ओस्माने डेम्बेलेने केलेल्या गोलला सर्थी मॅल्यीच्या स्वयंगोलची साथ लाभल्याने फ्रान्सने कझाकस्तानला २-० असे पराभूत केले. स्पेनने जॉर्जिआवर २-१ अशी मात करताना चौथ्या गटातील अग्रस्थानासह विश्वचषकात स्थान मिळवले आहे. सर्जिओ गनाब्रीने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर जर्मनीने रोमानियावर १-० अशी मात केली. पहिल्या गटात आघाडीवर असलेल्या इटलीने बल्गेरियाला २-० असे नमवले.

    व्हीएआर सुविधाही पुरविणार!

    फिफा विश्वचषक पात्रता फेरीसाठी सर्बियाविरुद्धच्या लढतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोने शेवटच्या मिनिटाला नोंदवलेला गोल पंचांकडून नाकारण्यात आला; परंतु प्रत्यक्षात पुनर्आढावा (रिप्ले) पाहिल्यानंतर हा गोल वैध असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता या पात्रता सामन्यांसाठीही व्हिडीओ साहाय्यक प्रणालीची (व्हीएआर) सुविधा पुरवण्यात येण्याची शक्यता आहे.